By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:07 IST
1 / 8आपल्या स्टाईल व फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी मौनी रॉयचे नवे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. मौनीच्या या फोटोंवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये.2 / 8या फोटोंमध्ये मौनीने प्रिन्टेड सॅटीन सिल्कचा जंपसूट घातला आहे. यात मौनी एकदम हॉट दिसतेय.3 / 8मौनीने हे फोटो शेअर केलेत आणि काहीच तासांत सहा लाखांवर लोकांनी ते पाहिले.4 / 8चाहतेच नाही तर सेलिब्रिटींनीही मौनीच्या या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. अदा खान, मंदिरा बेदी आदींनी या फोटोवर कमेंट केली आहे.5 / 8मौनीने तिच्या करिअरची सुरूवात २००७ साली मालिका 'क्यों सास भी कभी बहु थी'मधून केली होती.6 / 8मौनीला सुरुवातीपासूनच अभिनेत्री व्हायचे होते. शालेय शिक्षण मौनीने पश्चिम बंगालमधून घेतले. यानंतर तिने दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून ग्रेजुएशन पूर्ण केले.7 / 8तिने आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून केली होती. पहिल्यांदा रन सिनेमातील एका गाण्यात बॅकग्राऊंड डान्सर म्हणून दिसली होती. 8 / 8 2018मध्ये अक्षय कुमारसोबत 'गोल्ड' सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर ती रोमियो अकबर वाल्टर, मेड इन चायना सिनेमात दिसली आहे. लवकरच ती अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट यांच्या 'ब्रम्हास्त्र' सिनेमात दिसणार आहे.