Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मला हॉटेलच्या रुममध्ये बोलवलं अन्...',अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:31 IST

1 / 7
मनोरंजन विश्वात कास्टिंग काऊच हा प्रकार काही नवीन नाही. अनेक कलाकारांना कास्टिंग काऊचचा अनुभव आला आहे. फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव अनेक अभिनेत्रींना आला आहे. याबद्दल कोणी उघडपणे बोललं तर कोणी आजही समोर आलेले नाही.
2 / 7
प्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंग हिने अलीकडेच तिचा कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव सांगितला होता. स्ट्रगल दरम्यान तिला आलेल्या कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.
3 / 7
छोट्या पडद्यावरील ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेतून मोना सिंह ही अभिनेत्री घराघरात पोहोचली. मोनाने मालिकांबरोबर अनेक चित्रपटांतही काम केलं आहे.
4 / 7
‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेतून लोकप्रियता मिळवलेल्या मोनाने बॉलिवूड चित्रपटातही काम केलं आहे.. मोनाने थ्री इडियट्स', 'लाल सिंग चड्ढा' यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
5 / 7
मोना सांगते की, ती लहान वयातच अभिनयाच्या प्रेमात पडली. तिला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं पण त्यासाठी काय करावं हे तिला कळत नव्हतं. अशा परिस्थितीत ती फक्त ऑडिशन्स देण्यासाठी पुणे ते मुंबई असा प्रवास करत असे.
6 / 7
कामानिमित्त मोनला रोज पुणे ते मुंबई असा बसने प्रवास करावा लागायचा. यादरम्यान तिने देखील कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला.
7 / 7
मोना म्हणाली, ''मला खूप वाईट अनुभव आला आहे... असे बरेच लोक होते ज्यांनी मला एकदा हॉटेलच्या खोलीत बोलावले आणि मी निघून गेले. ते माझ्या चेहऱ्यासोडून सगळीकडे रोखून पाहायचे. मी खूप अस्वस्थ व्हायचे. तडजोड करणं आणि दिग्दर्शक जे सांगेल ते करणं ही इंडस्ट्रीत अगदी सामान्य गोष्ट आहे.''
टॅग्स :मोना सिंगकास्टिंग काऊच