By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 12:57 IST
1 / 7वेब विश्वातील 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी मिथिला पालकर (Mithila Palkar) तिच्या क्युट बबली अंदाजाने नेहमीच प्रेमात पाडते. कुरळे केस (Curly hair girl) ही तर तिची खरी ओळक आहे.2 / 7'लिटिल थिंग्स','गर्ल इन द सिटी' या सीरिजमुळे तिल खरी लोकप्रियता मिळाली. 'मुरांबा' या मराठी सिनेमातही तिने काम केलं. शिवाय साऊथमधील काही सिनेमांमध्येही ती झळकली. 3 / 7मिथिला सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. नुकतंच तिने ख्रिसमस निमित्त काढलेले फोटो शेअर केले. यामध्येही ती एकदम क्युट दिसत आहे.4 / 7लाल रंगाचा ब्रालेट टॉप, व्हाईट पँट, डोक्यावर ख्रिसमस बँड लावलेलं आहे. घरात तिन छान ख्रिसमस ट्री सजवला आहे. समोर स्ट्रॉबेरीज आणि इतर फळं ठेवली आहेत.5 / 7मिथिलाने या लूकमध्ये शेअर केलेले फोटो अगदीच गोड आहेत. त्यातच तिची क्युट स्माईल प्रेमातच पाडणारी आहे.6 / 7मिथिला आणि भाडिपाच्या गँगने काल रात्री एकत्र ख्रिसमस साजरा केलेला दिसतोय. तिने भाडिपाचा संस्थापक सारंग साठ्येसोबतही फोटो शेअर केला आहे. 7 / 7तसंच तिचा जवळचा मिच्र, जिम ट्रेनर नुपूर शिखरेसोबतही तिने फोटो शेअर केला आहे. नुपूर शिखरे हा आमिर खानचा जावई आहे.