Join us
Daily Top 2Weekly Top 5

Milind Soman Wedding Anniversary: वयाने २६ वर्षे मोठ्या असणाऱ्या मिलिंद सोमणच्या प्रेमात पडली होती अंकिता कुंवर, अशी झाली होती पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 16:21 IST

1 / 10
बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांच्या लग्नाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत.
2 / 10
लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने मिलिंद सोमणने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर अंकिता आणि त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
3 / 10
मिलिंदच्या या पोस्टवर लाइक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसतो आहे.
4 / 10
खरेतर मिलिंद सोमण आणि अंकिताचे लग्न झाले तेव्हा अनेकजण अवाक् झाले होते. त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे त्यांना ट्रोलही केले होते.
5 / 10
मिलिंद आणि अंकिताने ५ वर्षे एकमेकांना डेट केल्यांनतर २२ एप्रिल २०१८ साली अलिबाग येथे लग्न केले होते. त्यानंतर ११ जुलै, २०१८ ला दोघांनी स्पेनमध्ये लग्न केले होते. मिलिंद ५५ वर्षांचा आहे तर अंकिता फक्त २८ वर्षांची. अंकिता मिलिंदपेक्षा २६ वर्षांनी लहान आहे.
6 / 10
ह्युमन्स ऑफ बॉम्बे नामक फेसबुक पेजवर अंकिता आणि मिलिंदने त्यांची लव्हस्टोरी शेअर केली होती. त्यात अंकिताने सांगितले होते की, मी देश सोडून जायचे ठरविले होते. मी मलेशियातील एअर एशियासोबत केबिन क्रू म्हणून काम करायला सुरूवात केली होती. हा तो काळ होता जेव्हा माझ्या बॉयफ्रेंडचे अचानक निधन झाले होते.
7 / 10
अंकिताने पुढे सांगितले की, मी पूर्णपणे कोलमडून गेली होती आणि मला वाटू लागले होते की आता काहीच ठीक होणार नाही. काही महिन्यानंतर माझी पोस्टिंग चेन्नईला झाली होती.
8 / 10
अंकिता पुढे म्हणाली की, एक दिवस मी मिलिंद सोमणला लॉबीत पाहिले. मी त्यांची खूप मोठी फॅन होती. मी त्यांना हॅलो केले पण ते बिझी होते.
9 / 10
अंकिता नुसार काही दिवसांनी आमची भेट चेन्नईतील एका नाइट क्लबमध्ये झाली होती. मी मिलिंदकडे पाहत होते आणि तो माझ्याकडे पाहत होता. माझ्या फ्रेंडने सांगितले की तू जाऊन त्यांच्याशी बोल. काही दिवसानंतर आम्ही एकमेकांचे नंबर शेअर केले.
10 / 10
लग्नाच्या आधी ५ वर्षे आम्ही एकमेकांना डेट केले होते, असे अंकिताने या पोस्टमध्ये सांगितले.
टॅग्स :मिलिंद सोमण अंकिता कुंवर