By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 16:46 IST
1 / 8'माझ्या नवऱ्याची बायको' ही झी मराठी वाहिनीवरील गाजलेली मालिका. नावामुळेच ही मालिका चर्चेत आली होती. 2 / 8मालिकेत अनिता दाते केळकर, अभिजीत खांडकेकर आणि रसिका सुनील यांच्या मुख्य भूमिका होत्या. अनिताने राधिकाची भूमिका साकारली होती. तर अभिजीत गुरूनाथच्या भूमिकेत होता. 3 / 8'माझ्या नवऱ्याची बायको'मधली शनाया प्रेक्षकांना खूपच आवडली होती. शनायाच्या भूमिकेत रसिका सुनील होती. या भूमिकेने रसिकाला प्रसिद्धी मिळवून दिली. 4 / 8रसिकाने जवळपास ४ वर्ष मालिकेत काम केलं. नंतर तिने मालिका सोडली होती. 5 / 8२०२१ मध्ये रसिकाने आदित्य बिलागीसोबत लग्न करत संसार थाटला आहे. तिचा नवरा पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. 6 / 8'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर रसिका काही सिनेमांमध्ये दिसली. गर्लफ्रेंड, बघतोस काय मुजरा कर, उर्मी, बस स्टॉप, फकाट, तुला कळणार नाही या चित्रपटांत तिने काम केलं आहे. 7 / 8रसिका सध्या दोन वाजून बावीस मिनिटांनी या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. 8 / 8रसिका सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक अपडेट्स ती चाहत्यांना देत असते.