1 / 11बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ रवीना टंडन हिचे एक फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतेय. या फोटोशूटला रवीनाने ‘आत्मनिर्भर’ नाव दिले आहे.2 / 11खास म्हणजे, या फोटोशूटसोबत रवीनाने निसर्ग चक्रीवादळासाठी सज्ज राहण्याचे म्हटले आहे.3 / 11‘आत्मनिर्भर’ फोटोशूट, निसर्ग चक्रीवादळ येण्यापूर्वी चेकलिस्ट... आणीबाणीच्या काळात बॅटरी चार्ज ठेवा. गरजेच्या वस्तू सोबत ठेवा. एक चांगला सिनेमा फोनमध्ये डाऊनलोड करून ठेवा, असे तिने फोटो शेअर करताना लिहिले आहे.4 / 11सर्वजण सुरक्षित राहा. चक्रीवादळ फार हानी करणार नाही अशी मी आशा करते. मुंबईकर हिंमतीने या संकटाचा सामना करतील, असेही तिने लिहिले आहे.5 / 11‘आत्मनिर्भर’ नावाच्या या फोटोशूटमध्ये रवीनाने स्टाइलिश फोटो शेअर केले आहेत.6 / 11या फोटोंमध्ये रवीना डेनिम लूकमध्ये दिसतेय.7 / 11 रवीना लकरच सुपरस्टार यशसोबत ‘केजीएफ- चॅप्टर 2’ या सिनेमात झळकणार आहे. 8 / 11लॉकडाऊनआधी रवीना ‘केजीएफ- चॅप्टर 2’च्या शूटींगसाठी हैदराबादेत गेली होती.9 / 11रवीनाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. आजही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जाते.10 / 11 मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या. 11 / 11‘मोहरा’ हा तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...’ हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची 'मस्त मस्त गर्ल' म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली.