Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मासूम'मधली चिमुकली पिंकी झाली ५२ वर्षांची, 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 12:54 IST

1 / 11
१९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या क्लासिक चित्रपटात 'पिंकी'ची भूमिका साकारणारी ती छोटी गोंडस मुलगी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
2 / 11
सिनेमातील 'लकडी की काठी' गाणं ऐकली की या चिमुकलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो. तिच्या मासूम चेहऱ्यामुळे, एक्सप्रेशन्समुळे तिने प्रेक्षकांना प्रेमातच पाडलं होतं.
3 / 11
मासूम मधली ही पिंकी अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून दिसल्यानंतर काही वर्षांनी ती बॉलिवूडची स्टार अभिनेत्री बनली होती. कोण आहे ही?
4 / 11
ही आहे सर्वांची लाडकी उर्मिला मातोंडकर. उर्मिलाने 'मासूम'शिवाय 'कलयुग','संगम','कर्म' या सिनेमांमध्येही बालकलाकाराची भूमिका साकारली. तसंच १९८० साली 'झाकोळ' या मराठी सिनेमातही ती डॉ श्रीराम लागूंसोबत झळकली.
5 / 11
उर्मिलाने १९९१ मध्ये 'नरसिंहा' चित्रपटातून मुख्य अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं.मात्र, खऱ्या अर्थाने तिला स्टारडम मिळवून दिलं ते राम गोपाल वर्मा यांच्या 'रंगीला' (१९९५) या चित्रपटाने. या चित्रपटानंतर उर्मिला रातोरात नॅशनल क्रश बनली.
6 / 11
'जुदाई', 'सत्या', 'प्यार तूने क्या किया' आणि 'भूत' सारख्या चित्रपटातून तिने आपल्या अभिनयाची ताकद सिद्ध केली.
7 / 11
उर्मिलाच्या करिअरमध्ये दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांचा मोठा वाटा होता. मात्र, चित्रपटसृष्टीत अशी चर्चा सुरू झाली की उर्मिला केवळ राम गोपाल वर्मा यांच्यासोबतच काम करण्यास प्राधान्य देते.
8 / 11
यामुळे इतर बड्या दिग्दर्शकांनी उर्मिलाला आपल्या चित्रपटात घेणं टाळलं. जेव्हा राम गोपाल वर्मा आणि उर्मिला यांच्यात मतभेद झाले त्यानंतर तिला इतर प्रोजेक्ट्समध्येही काम मिळेनासं झालं. यामुळेच तिच्या करिअरचा डाऊनफॉल सुरु झाला.
9 / 11
उर्मिलाच्या रोखठोक स्वभावामुळे तिचे इंडस्ट्रीत अनेकांशी खटके उडाले. ९० च्या दशकात एका विशिष्ट लॉबीचा बॉलिवूडवर प्रभाव होता. त्या काळात उर्मिलाने घेतलेले काही निर्णय आणि काही बड्या निर्मात्यांसोबत झालेले वाद तिला व्यावसायिकदृष्ट्या महाग पडले. हळूहळू तिला मिळणाऱ्या चित्रपटांची संख्या कमी होत गेली.
10 / 11
आज उर्मिला ५२ वा वाढदविस साजरा करत आहे. आजही ती कमालीची सुंदर आणि फिट दिसते. उर्मिलाने काही वर्षांपूर्वी राजकारणातही प्रवेश केला होता. तिने मात्र तिथेही ती टिकली नाही.
11 / 11
आज उर्मिला ५२ वा वाढदविस साजरा करत आहे. आजही ती कमालीची सुंदर आणि फिट दिसते. उर्मिलाने काही वर्षांपूर्वी राजकारणातही प्रवेश केला होता. तिने मात्र तिथेही ती टिकली नाही.
टॅग्स :उर्मिला मातोंडकरबॉलिवूडनसिरुद्दीन शाह