Join us  

मराठमोळ्या श्वेता शिंदेचा नवरा आहे प्रसिद्ध अभिनेता, एकदा वाचा त्यांची भन्नाट लव्हस्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 7:00 AM

1 / 10
श्वेता शिंदे ही मराठीतील एक आघाडीच्या अभिनेत्रीसोबत निर्मातीदेखील आहे. ती निर्मिती क्षेत्रात बरेच वेगवेगळे प्रयोग करताना दिसत असते.
2 / 10
देवमाणूस, लागिरं झालं जी मालिकेची निर्मिती केली आहे.
3 / 10
अभिनेत्री श्वेता शिंदेचा नवरादेखील प्रसिद्ध अभिनेता आहे. हा अभिनेता म्हणजे संदीप भन्साळी.
4 / 10
श्वेता शिंदे आणि संदीप भन्साळीची लव्हस्टोरी एकदम भन्नाट आहे. या कपलची पहिली भेट कशी झाली त्यांचं नेमकं कस जमलं याबद्दल श्वेता झी मराठीच्या ‘बँड बाजा वरात’ कार्यक्रमात बोलताना दिसली.
5 / 10
श्वेता आणि संदीप यांची पहिली भेट शूटिंगच्या सेटवर झाली आणि पहिल्याच भेटीत त्यांचे जोरदार भांडण झाले.
6 / 10
या खडाजंगी भांडणानंतर श्वेताच्या वाढदिवशी संदीप यांनी सरप्राईज प्लान करून तिच्यासाठी सेटवर केक मागवला होता.
7 / 10
श्वेताला याबद्दल काहीच कल्पना नसल्याने तिलाही आनंद झाला. जेव्हा तिला या सर्प्राइजबद्दल समजलं तेव्हा तिलाही आश्चर्य वाटलं. संदीप यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्यातील भांडण मिटले.
8 / 10
हळूहळू श्वेता आणि संदीप यांच्या भेटीगाठी वाढल्या आणि त्यांचे प्रेम जमलं.
9 / 10
संदीप भन्साळी अभिनय क्षेत्रापासून दुरावले आहेत. ते एक डिजिटल मेन्टॉर आहेत. तसेच त्यांचे मार्केटिंग क्षेत्रातही ज्ञान आहे असं त्यांच्या सोशल मीडियावरून कळून येतं.
10 / 10
श्वेता आणि संदीपचे मिलन म्हणजे साताऱ्याचा कंदी पेढा आणि सिंधी कढीचा संगम अशी उपमा त्यांना दिली जात आहे.
टॅग्स :श्वेता शिंदे'देवमाणूस २' मालिकालागिरं झालं जी