Join us

तुझ्यात जीव रंगला! राणादा-पाठबाईंचं रोमॅन्टिक फोटोशूट चर्चेत, नेटकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:52 IST

1 / 7
या मालिकेत राणादा-पाठकबाईंची व्यक्तिरेखा साकारून हार्दिक-अक्षया घराघरात पोहोचले.
2 / 7
त्यादरम्यान मालिकेत काम करत असताना अक्षया आणि हार्दिकचे खऱ्या आयुष्यातही सूर जुळले. त्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली.
3 / 7
सोशल मीडियावर दोघांचीही मोठी फॅनफोलोइंग असल्याची पाहायला मिळते.
4 / 7
त्याचबरोबर अक्षया-हार्दिक यांच्याविषयी जाणून घेण्यास चाहते कायम उत्सुक असतात.
5 / 7
दरम्यान, नुकतेच अक्षया देवधरने सोशल मीडियावर नवऱ्यासोबतचे रोमॅन्टिक फोटो पोस्ट केले आहेत. त्यांचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहेत.
6 / 7
या फोटोशूटसाठी हार्दिकने पांढरा कुर्ता आणि त्यावर हिरव्या रंगाचं जॅकेट परिधान केलंय. तर अक्षया भगव्या रंगाची साडी नेसून पारंपरिक अंदाजात पाहायला मिळतेय.
7 / 7
त्यांच्या या रोमॅन्टिक फोटोंवर चाहत्यांसह अभिनेत्री ऋतुजा बागवे तसेच अमोल नाईक यांनी कमेंट्स केल्या आहेत.
टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीसेलिब्रिटीसोशल मीडिया