Join us

राजा रानीची गं जोडी: ढाले-पाटलांच्या घरात गणरायाचं आगमन; पाहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 18:32 IST

1 / 9
गणरायाच्या आगमनासाठी अवघे दोन दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे सध्या सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु आहे. विशेष म्हणजे यात मालिकादेखील कुठेही मागे नाहीत.
2 / 9
छोट्या पडद्यावरील 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेच्या सेटवरही गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
3 / 9
ढाले-पाटलांच्या वाड्यात लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार असून संपूर्ण कुटुंब या गणेशोत्सवाच्या गडबडीत रंगून गेले आहेत.
4 / 9
ढोलताशाच्या गजरात ढाले पाटलांच्या घरात बाप्पाचं आगमन
5 / 9
रणजीत घरी बाप्पाची स्थापना करणार असून घरातल्यांनी बाप्पाच्या स्वागताची मोठी तयारी केली आहे.
6 / 9
एकीकडे संपूर्ण गणरायाच्या सेवेत लीन असतानाच संजू मात्र तिची ड्युटी बजावत आहे.
7 / 9
ड्युटी संपल्यावर संजू बाप्पाच्या चरणी लीन होणार असून सध्या ती घरची आणि कामाची अशी दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे.
8 / 9
“खर्‍या आयुष्यात अनेक मुली,लग्न झालेल्या स्त्रिया त्यांची नोकरी सांभाळून घराच्या जबाबदार्‍या अगदी चोखपणे पार पडताना दिसतात. मला त्या सगळ्या स्त्रिया, मुलींचा अभिमान आणि कौतुक आहे. आणि मी नशीबवान आहे मला अशी भूमिका करण्याची संधी मिळाली', असं अभिनेत्री शिवानी सोनार म्हणाली.
9 / 9
गणरायाच्या चरणी लीन झालेलं ढाले-पाटील कुटुंब.
टॅग्स :गणेशोत्सव विधीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारगणेशोत्सव