Join us

"मॅच्युअर असते तर लग्न टिकलं असतं", घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला झालेला पश्चाताप, १२ वर्षांनी मोठा होता पती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 15:45 IST

1 / 8
रेशम टिपनीस ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रेशम तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते.
2 / 8
तिचं लग्न 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम संजीव सेठशी झालं होतं. मात्र लग्नानंतर काही वर्षांतच घटस्फोट झाला आणि त्यांचा संसार मोडला.
3 / 8
रेशम आणि संजीव सेठ यांना दोन मुलं होतं. पण, घटस्फोटानंतर रेशम टिपनीसला पश्चाताप झाला होता. एका मुलाखतीत तिने हे बोलून दाखवलं होतं.
4 / 8
'लग्न झालं तेव्हा मी २० वर्षांची होते. लगेच गरोदर राहिले, आई झाले. घराची, मुलांची जबाबदारी सांभाळण्यासाठी मी इतकी सक्षम नव्हते. माझ्यात तितकी समजही नव्हती'.
5 / 8
'माझ्या आणि संजीवच्या वयात १२ वर्षांचं अंतर होतं. जर आम्ही दोघे तितके मॅच्युअर असतो तर आमचा घटस्फोट झालाच नसता', असं रेशम म्हणाली होती.
6 / 8
१९९३ मध्ये रेशम टिपनीस आणि संजीव सेठ यांनी लग्नगाठ बांधली होती. पण, २००४ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले.
7 / 8
संजीव सेठ यांनी त्यानंतर अभिनेत्री लता सबरवाल हिच्याशी लग्न केलं होतं. पण, १४ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी देखील घटस्फोट घेतला आहे.
8 / 8
तर रेशम टिपनीस बॉयफ्रेंड संदेश कीर्तिकरसोबत सध्या लिव्ह इनमध्ये राहत आहे.
टॅग्स :रेशम टिपणीसटिव्ही कलाकार