1 / 9उषा नाडकर्णी यांना प्रेक्षकांनी खलनायिका आणि खट्याळ सासूच्या भूमिकेत पाहणं जास्त पसंत केलं. मराठीसोबत त्यांनी हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीदेखील गाजवली.2 / 9उषा नाडकर्णी यांनी नुकतीच 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्याविषयी भाष्य करताना एक प्रसंग सांगितला. 3 / 9त्या म्हणाल्या, '२-३ वर्षांपूर्वी मी हॉस्पिटलमध्ये होते. मी रात्रीची अस्वस्थ होऊन उठून बसायचे. तोंडात पंप मारायचे'. 4 / 9'त्याच्यानेही काही होत नव्हतं. कधीतरी सकाळी झोप लागायची. अंघोळ केली तर अंग पुसता यायचं नाही. वाकता यायचं नाही'. 5 / 9'मी भावाला फोन केला आणि सगळं सांगितलं. त्याने मला मालाडला शाह नावाच्या डॉक्टरकडे बोलवून घेतलं'. 6 / 9'डॉक्टरांनी मला तपासलं आणि म्हणाले हिला आत्ताच्या आता आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. हार्टपपिंग बरोबर नाही'. 7 / 9'मग हिंदुजामध्ये भावाने मला नेलं. मी तिथे आयसीयूमध्ये ८ दिवस होते. जागा बदलली की मला झोप येत नाही'. 8 / 9'एकदा आयसीयूमध्ये असंच झालं. मी रात्री जागी होते. रात्री शिकाऊ डॉक्टर येतात'. 9 / 9'त्यांनी मला विचारलं सोयी नही क्या? मी म्हटलं नही निंद नही आती. त्यावर ते म्हणाले हा...फिल्म में होती तो आती थी. मला एवढी मजा वाटली. त्या काळोखात पण त्यांनी मला ओळखलं'.