Join us

'सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया', प्रिया बापटचं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:23 IST

1 / 9
प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने मराठीसह हिंदीतही आपले स्थान निर्माण केले आहे.
2 / 9
नुकतीच प्रिया बापटची अंधेरा ही हिंदी हॉरर वेबसीरिज भेटीला आली. यात तिने पोलिसाची भूमिका साकारली आहे.
3 / 9
अंधेरा सीरिजनंतर लवकरच ती बिन लग्नाची गोष्ट सिनेमात झळकणार आहे. यात तिच्यासोबत उमेश कामत मुख्य भूमिकेत आहे. त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
4 / 9
याशिवाय प्रिया बापट सध्या तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. तिने सिनेमाच्या प्रमोशनसाठी हा गेटअप केला होता.
5 / 9
प्रियाने सिल्व्हर रंगाचा जंपसूट परिधान केला आहे. कानात मोठे इअररिंग्स घातलेत आणि हाय पोनीटेल बांधला आहे.
6 / 9
प्रिया बापटने सिल्व्हर आउटफिटवर गोल्डन बॅकग्राउंडवर फोटोशूट केले आहे आणि एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
7 / 9
तिने हे फोटोशूट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘सुवर्ण स्वप्नांचे जग आणि रुपेरी पडद्याची दुनिया'
8 / 9
नेहमीप्रमाणे प्रिया बापटच्या यादेखील फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
9 / 9
प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
टॅग्स :प्रिया बापट