1 / 10अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि अमृता खानविलकर टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आहेत. मात्र अचानक दोघांच्या नात्यात कटुता आल्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला होता. 2 / 10खरेतर अमृता खानविलकरने पती हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर चाहते त्यांच्या नात्याबाबत गोंधळून गेले होते.3 / 10आता ६ वर्षांनंतर अमृताचा नवरा आणि अभिनेता हिमांशूने अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आणि मतभेदाच्या वृत्तांमध्ये तथ्य असल्याचं सांगितले.4 / 10फिल्मीबिट प्राइमला दिलेल्या लेटेस्ट मुलाखतीत हिमांशूने सांगितले की, जवळपास ६ वर्षांपूर्वी त्याची पत्नी अमृताने त्याला सोशल मीडियावर फक्त ब्लॉक केले नव्हते तर अनफॉलो पण केले होते.5 / 10हिमांशू म्हणाला की, फक्त ब्लॉक केलं नाही तर मला अनफॉलो केलं होतं. मी शूट करत होतो आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. यादरम्यान आमच्यात वाद झाले होते. अमृताने रागाने मला अनफॉलो केले होते.6 / 10हिमांशू पुढे म्हणाला की, त्यावेळी मी राजस्थानमध्ये शूट करत होतो. ७-८ दिवसांचं शूट होतं. २०१५ साली आमचं लग्न झालं होतं. ही गोष्ट त्यानंतरची आहे. मला वाटतं की, घाई गडबडीमुळे असं होतं.7 / 10अमृता खानविलकरने भलेही हिमांशूला त्यावेळी अनफॉलो केलं होतं. मात्र इतक्या वर्षांनंतरही ते एकत्र आहेत.8 / 10यापूर्वी बॉम्बे टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अमृता खानविलकरने पती हिमांशूसोबतच्या नात्यावर भाष्य केले होते. ती म्हणाली होती की, मला आता जाणीव होतेय की, मी हिमांशूला ब्लॉक करून किती बालीश वर्तणूक केली होती.9 / 10तो पूर्ण रात्र मला कॉल करत होता, पण मी त्याचा नंबर ब्लॉक केला होता, असे अमृताने सांगितले.10 / 10हे घाईत उचलले पाऊल होते. तेव्हा मला जाणीव नव्हती की, यामुळे आमच्या लग्नावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या चर्चांना उधाण आले, असेही तिने सांगितले.