By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 10:53 IST
1 / 10अभिनेत्री प्रिया बापट सातत्याने चर्चेत येत असते. आता नुकतीच तिची अंधेरा ही वेबसीरिज रिलीज झाली आहे. त्यानंतर आता तिचा उमेश कामत सोबतचा बिन लग्नाची गोष्ट हा सिनेमा १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.2 / 10यादरम्यान तिचा एक जुन्या मुलाखतीतला व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यात अभिनेत्रीने तिचा दिवसाढवळ्या विनयभंग झाल्याचा खुलासा केला होता.3 / 10प्रिया बापटने काही दिवसांपूर्वी हॉटरफ्लायला मुलाखत दिली होती. त्यात तिने सांगितले होते की, एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत लाजिरवाणी गोष्ट केली होती, ज्याचा राग आजही तिच्या मनात आहे. 4 / 10प्रिया बापट म्हणाली की, 'मी एके दिवशी शूटिंगवरून परत येत होते. माझ्या दोन्ही हातात सामान होते आणि मी चालत असताना फोनवर एका मैत्रिणीशी बोलत होते. अचानक एक अनोळखी व्यक्ती माझ्या समोर आला आणि त्याने माझे स्तन पकडले. त्यानंतर तो लगेच पळून गेला.'5 / 10प्रिया बापटने पुढे सांगितले की, 'मला काय झाले हेच कळले नाही. काय घडले हे समजायला मला तीन सेकंद लागले. जेव्हा मी मागे वळून पाहिले, तेव्हा ती व्यक्ती तिथे नव्हती.' 6 / 10'मी घरी आले. पण घरी आई नव्हती, फक्त वडील होते. मी फक्त रडत होते आणि वडिलांना हे कसे सांगायचे हे मला समजत नव्हते. त्यांनी वारंवार विचारल्यानंतर जेव्हा मी त्यांना सर्व सांगितले, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले. ते स्वतः पुरुष असल्याबद्दल त्यांना अपराधी वाटले आणि त्यांना काय करावे हे समजत नव्हते.', असे अभिनेत्री म्हणाली.7 / 10त्या घटनेनंतर आजही तो राग माझ्या मनात आहे, असे प्रिया बापटने सांगितले. ती बोलली, 'आता जर मला कोणाची नजर जरी वाईट वाटली, तर माझ्या मनात विचार येतो की, तो येऊन मला स्पर्श करण्याआधी मी त्याला पकडून खूप मारले पाहिजे.'8 / 10वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकतीच प्रिया बापटची 'अंधेरा'ही हॉरर वेब सीरिज रिलीज झाली आहे. यात ती पोलिस अधिकारी आहे. तिच्यासोबत सुरवीन चावला आणि प्राजक्ता कोळीही मुख्य भूमिकेत आहेत.9 / 10प्रिया बापट आणि उमेश कामत ही ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीनही सर्वांची आवडती जोडी आहे. जवळपास १२ वर्षांनंतर ते 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमात एकत्र दिसणार आहेत. 10 / 10प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या 'बिन लग्नाची गोष्ट' चित्रपट १२ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.