By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 11:50 IST
1 / 9तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच तेजस्विनी एक निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. 2 / 9पण, तेजस्विनीचं शिक्षण किती हे तुम्हाला माहितीये का? तेजस्विनीने फक्त दहावीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. आरपारला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने याबद्दल भाष्य केलं. 3 / 9अभिनय क्षेत्रात यायचं असं मी कधीच ठरवलं नव्हतं. मला इंटेरियर डिझायनिंग किंवा फॅशन डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट होता, असं तेजस्विनी म्हणाली. 4 / 9दहावीनंतर मला इंटेरियर किंवा फॅशन डिझायनिंग करायचं होतं. फॅशन डिझायनिंगकडे माझा कल जास्त होता. 5 / 9तेव्हा मी सिंहगड इन्स्टिट्यूटला इंटेरियर डिझायनिंग बघत होते. आणि NIFT मध्ये फॅशन डिझायनिंगची विचारणा केली होती. 6 / 9पण, दोन्ही कोर्सची फी तेव्हा ८० हजार वगैरे अशी होती. माझ्या वडिलांनी सांगितलं की तेजू माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्यामुळे तुझी अॅडमिशन नाही करू शकत. 7 / 9मला अकरावी, बारावी असं नॉर्मल शिक्षण घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मी माझ्या वडिलांना सांगितलं की ठीक आहे पण मला याच क्षेत्रात काहीतरी करायचंय. 8 / 9आता पैसे नसतील तर आपण नको करुयात. जेव्हा मी कमवेन किंवा पैसे येतील तेव्हा मी शिक्षण घेईन. 9 / 9त्यानंतर मी सिनेइंडस्ट्रीत आले. त्यानंतर मग मी इथे इतकी रुळले की शिक्षण घेण्यासाठी नंतर वेळच मिळाला नाही.