By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 12:44 IST
1 / 7मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) सध्या चर्चेत आहे. लवकरच ती सुबोध भावेसोबत नवीन प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. ही मालिका आहे की कोणता सिनेमा हे अजून दोघांनीही उघड केलेलं नाही. 2 / 7 तेजश्री आणि सुबोधची जोडी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. नुकतंच त्यांनी 'हॅशटॅग तदैव लग्नम' सिनेमात पहिल्यांदाच काम केलं होतं. दरम्यान तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर ती पुन्हा टीव्हीवर येणार का असा प्रश्न तिला सतत विचारला जात आहे.3 / 7तेजश्रीने एका हिंदी सिनेमातही काम केलं होतं हे तुम्हाला माहितीये का? तसंच पहिल्याच हिंदी सिनेमात तिने चक्क किसींग सीन दिला होता.4 / 7हा सिनेमा होता २०२१ साली आलेला 'बबलू बॅचलर'. यामध्ये शर्मन जोशी मुख्य अभिनेता होता. यामध्ये शर्मन आणि तेजश्रीचा एक किसींग सीन दाखवण्यात आला आहे.5 / 7नेहमी सोज्वळ भूमिकांमध्ये दिसलेल्या तेजश्रीने असा सीन दिल्याने तेव्हा तिला ट्रोल करण्यात आलं होतं. चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तर काही जणांनी तिचं कौतुकही केलं होतं.6 / 7तेव्हा तेजश्री म्हणालेली की, 'मलाही सुरुवातीला सीन करायला कठीण वाटत होतं. पण पटकथा वाचल्यावर लक्षात आलं की हा सीन कथेची गरज आहे. फक्त मनोरंजनासाठी नाहीए.' 7 / 7सीन करताना शर्मनने मला कंफर्टेबल केलं होतं. आमची केमिस्ट्री चांगली जुळून आली होती. त्याने मला सांभाळून घेतलं. तसंच याबाबतीत कोणीही मराठी आणि बॉलिवूड अभिनेत्री असा फरक करु नये असं मला वाटतं.'