"राधा ही 'ब्रा'वरी" म्हणत श्रुती मराठेला केलेलं ट्रोल, सांगितला 'तो' अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 12:44 IST
1 / 9मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. २०१२ मध्ये झी मराठीवर श्रुती मराठेची 'राधा ही बावरी' ही मालिका प्रसारित झाली आणि ती अल्पावधीतच घराघरात लोकप्रिय झाली.2 / 9'राधा ही बावरी' या मालिकेने श्रुतीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. मात्र, याच काळात तिला ट्रोलिंगचा मोठा सामना करावा लागला होता. 3 / 9एका मुलाखतीत तिने तिच्या 'राधा ही बावरी' या गाजलेल्या मालिकेदरम्यान तिला आलेल्या एका धक्कादायक ट्रोलिंग अनुभवाविषयी खुलासा केला होता. 4 / 9दक्षिणात्य चित्रपटातील एका बिकिनी सीनमुळे लोक तिला 'राधा ही ब्रावरी' म्हणून हिणवत होते, असे श्रुती मराठेने सांगितले होते. 5 / 9आरपार ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल खुलासा केला होता. ती म्हणाली की, 'मला अजूनही आठवतंय की २०१२ साली माझी 'राधा ही बावरी' मालिका आली होती. त्याआधी मी काही तमिळ सिनेमांमध्ये काम केलं होतं. त्यातील एक चित्रपट प्रचंड गाजला होता, कारण मी त्यात बिकिनी घातली होती.'6 / 9ती पुढे म्हणाली, 'आता साऊथ इंडस्ट्री आणि आपल्यातील अंतर कमी झालं आहे. साऊथचे सिनेमे आता हिंदीत भाषांतरित केले जातात. ओटीटीवर अनेक सिनेमे उपलब्ध आहेत.' 7 / 9'थिएटरमध्ये सिनेमे बघायला गेलात, तर सबटायटल्स (उपशीर्षक) असतात. पण, १०-१५ वर्षांपूर्वी अशी परिस्थिती नव्हती. तेव्हा मी नवीन होते. कोणत्या गोष्टी करायच्या किंवा कोणत्या पद्धतीने त्या केल्या जातात, शूट कशा केल्या जातात, याचे भान नव्हते. पण, आजही मी बिकिनीचा सीन का केला, असे मला अजिबात वाटत नाही.', असे ती म्हणाली.8 / 9तिने ट्रोलिंगच्या अनुभवाविषयी सांगताना म्हटलं, 'पण, मला अजूनही आठवतंय की तो चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेला. तेव्हा लोकांना मी बिकिनी घातली आहे किंवा तमिळमध्ये काम केलं आहे, हे माहीत नव्हतं.' 9 / 9२०१२ मध्ये जेव्हा 'राधा ही बावरी' मालिका गाजली आणि लोकांनी 'श्रुती मराठे कोण?' हे गुगल केलं, तेव्हा माझा पहिला फोटो बिकिनीचा यायला लागला. तेव्हा मला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. 'राधा ही ब्रावरी' वगैरे असं लोक म्हणायचे.'