1 / 9प्राजक्ता माळी मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अभिनयासोबत सौंदर्याने ती चाहत्यांना घायाळ करत असते. 2 / 9अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत येत असते.3 / 9नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने गुलाबी रंगाच्या विविध शेड लेहंग्यात फोटोशूट केलंय.4 / 9गुलाबी रंगाच्या वेगवेगळ्या शेडमधील लेहंग्यावर प्राजक्ताने हॉल्टर नेक ब्लाउज परिधान केला आहे. 5 / 9या फोटोत प्राजक्ता खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.6 / 9प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसते आहे. 7 / 9प्राजक्ता माळी शेवटची चिकी चिकी बुबूम बूम सिनेमात पाहायला मिळाली. यात महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार मंडळी पाहायला मिळाली. 8 / 9या सिनेमाच्या आधी प्राजक्ता फुलवंती या चित्रपटात पाहायला मिळाली. या चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.9 / 9प्राजक्ता माळीच्या फुलवंती सिनेमाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात तिच्यासोबत गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत होता.