"शिवाजी महाराजांची भेट झाली" सैराट फेम अरबाज शेख पोहोचला रायगडावर, शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:57 IST
1 / 10मराठी सिनेसृष्टीमध्ये नागराज मंजुळे यांचा सैराट (Sairat) हा सिनेमा इतिहास रचणारा ठरला. २०१६ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा केवळ एक प्रेमकथा नाही, तर समाजातील खोलवर रुजलेल्या जातीभेदावर थेट प्रकाश टाकणारा आणि प्रेक्षकांना विचार करायला लावणारा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यावर आजही अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं.2 / 10ग्रामीण भागातील परश्या आणि आर्चीची लवस्टोरी आजही महाराष्ट्रात चर्चेचा विषय असते. आर्ची आणि परश्या म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर व रिंकू राजगुरु सोबत त्यांचे मित्र देखील लोकप्रिय झाले.3 / 10सैराटमधील लंगड्या आणि बांगड्यावाल्या भाभीचा सल्ल्या ही पात्रे प्रेक्षकांना पसंत पडली होती.4 / 10लंगड्या ही भूमिका तानाजी गालगुंडे आणि सल्ल्या ही भुमिका अरबाज शेखनं साकारली होती. 5 / 10सद्या अभिनेता अरबाज शेख हा चर्चेत आला आहे. त्याच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. 6 / 10अरबाज शेखनं नुकतंच स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला भेट दिली. 7 / 10रायगडावरील काही फोटो त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. यावेळी त्याच्यासोबत त्याची मैत्रिण सिमरन पाहायला मिळाली.8 / 10छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ उभं राहून मानवंदना दिल्याचा फोटोही त्याने शेअर केला आहे. 9 / 10अरबाज शेखनं शेअर केलेल्या या पोस्टला 'आज छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाली' असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.10 / 10अरबाजनं व्यवसाय क्षेत्रात आपला जम बसवला आहे. त्याचा स्वतःचा 'बेक बडीज' नावाचा कॅफे आहे. पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेज समोर, आंबेगाव बुद्रुक इथे अरबाजचा कॅफे आहे.