1 / 10'सैराट' सिनेमातील सल्या म्हणजेच अभिनेता अरबाज शेखने काल सोशल मीडियावर लग्नाचे फोटो पोस्ट केले आणि सर्वांना सुखद धक्का दिला.2 / 10मात्र आपलं लग्न तीन वर्षांपूर्वीच झाल्याचा खुलासा आता त्याने केला आहे. मग आता फोटो पोस्ट करण्याचं कारण काय हेही त्याने सांगितलं आहे.3 / 10महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अरबाज शेख म्हणाला, 'आमचं लग्न ३ वर्षांपूर्वीच झालं. लग्नाचे फोटो आता टाकूया, नंतर टाकूया असं म्हणत आम्ही पोस्ट केलेच नाहीत. पण माझ्या घरी, मित्रपरिवाला लग्न झाल्याचं आधीच माहित आहे.'4 / 10आमचं लव्हमॅरेज आहे. मी सिमरनच्या लहानपणीच प्रेमात पडलो होतो. आम्ही एकाच शाळेत होते. नंतर ती पुण्यात शिकायला गेली आणि मी ११ वीत असताना सैराट केला. 5 / 10सैराटच्या वेळीच आमची लव्हस्टोरी सुरु झाली. मी तिला प्रपोज केलं. आमची जात एकच आहे त्यामुळे घरी सांगितल्यानंतर विरोध झाला नाही.6 / 10सिमरन खूप समजूतदार आहे. ती आयटी क्षेत्रात काम करते. सध्या आम्ही पुण्यात राहतो. मी शूटला बाहेरच्या ठिकाणी गेलो तर ती गावी जाते. कारण तिचं वर्क फ्रॉम होम असतं. 7 / 10आम्ही दोघंही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. अनेकदा आमच्याच समाजाकडून आम्हाला विरोध, रोषाचा सामना करावा लागतो. जन्माने मुस्लीम असलो तरी आम्ही मनाने मराठी आहोत.8 / 10काल मी फोटो पोस्ट केल्यावर सिमरन हिंदू आहे, पंजाबी आहे अशीही चर्चा झाली. पण आम्ही जातीत अडकणारे नाहीत. आम्ही जातपातच्या पलीकडे गेलो आहोत. 9 / 10सैराटची ऑफर आली तेव्हा मी आणि सिमरन संपर्कात नव्हतो. माझं काहीच स्थिर नव्हतं. त्यामुळे तिचे आईवडील हे स्थळ स्वीकारतील का ही शंका होती. पण मला सिमरनला मिळवायचंच होतं. सैराट केल्यावर हेच क्षेत्र चांगलं आहे हे मी ठरवलं. यात स्वत:ला सिद्ध केलं त्यामुळे सिमरनकडूनही होकार आला.10 / 10अरबाज नुकताच 'मटका किंग' वेबसीरिजमध्ये दिसला. यामध्ये त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आहे.