By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 07:00 IST
1 / 10सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.2 / 10सई ताम्हणकर हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.3 / 10सई ताम्हणकर चित्रपटाशिवाय तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.4 / 10सई ताम्हणकर बऱ्याचदा ग्लॅमरस आणि बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते.5 / 10सईने ‘नो एंट्री पुढे धोका आहे’ चित्रपटात बिकिनी परिधान केली होती. तिच्या या बिकिनी लूकची सर्वत्र खूप चर्चा झाली होती. काहींनी बिकिनी लूक पाहून सईला ट्रोल केलं तर काहींना कौतुक केलं.6 / 10सई ताम्हणकरने नुकतीच एका मुलाखतीत मराठी सिनेमात बिकनी परिधान करण्यावर आपले मत व्यक्त केले आहे.7 / 10ती म्हणाली, मराठी सिनेमात बिकिनी परिधान करणारी मी पहिली अभिनेत्री आहे हे मलाही माहित नव्हतं. असा विचारही मी कधी केला नाही. जी गोष्ट मला आवडते ती मी करते. भूमिकेची गरज होती म्हणून मी बिकिनी परिधान केली.8 / 10सई पुढे म्हणाली की, एक मुलगी जर समुद्रामधून बाहेर येत असेल तर ती ट्रॅक सूट परिधान करून थोडी बाहेर येणार. ती बिकिनीच घालणार. हे माझ्यासाठी इतकं सोपं होतं. पण यामुळे माझ्यावर बिकिनी परिधान केल्याचा एक टॅग लागला. 9 / 10आता मला इतकं काम करायचं आहे की लोक हा टॅग विसरून जातील.जेव्हा मी बिकिनी परिधान करून चित्रपटात काम केलं तेव्हा प्रेक्षक, प्रसारमाध्यमांचा मिळालेला प्रतिसाद पाहून मी आश्चर्यचकित झाल्याचं सईनं सांगितलं.10 / 10बऱ्याच लोकांनी माझ्या या नव्या लूकला पाठिंबा दिला. मला या लूकमध्येही सगळ्यांनी स्वीकारले. जेव्हा चित्रपटासाठी बिकिनी परिधान केली तेव्हा एवढी चर्चा होईल असा मी विचारही केला नव्हता, असं सई म्हणाली.