1 / 7सदाशिव अमरापूरकर आज जरी आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या खलनायकी भूमिका चांगल्याच गाजल्या. सदाशिव अमरापूरकर यांची मुलगीही मनोरंजन विश्वात कार्यरत आहे, हे फार कमी जणांना माहित असेल2 / 7सदाशिव अमरापूरकर यांनी १९७३ साली सुनंदा करमरकर यांच्याशी लग्न केलं. सुनंदा आणि सदाशिव यांच्या मुलीचं नाव आहे रीमा. 3 / 7सदाशिव यांची मुलगी रीमाने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिनय क्षेत्रात काम केलं नसलं तरीही ती मनोरंजन विश्वात सक्रीय आहे. याशिवाय तिने अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केलंय.4 / 7रीमा अमरापूरकरने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलंय. २००६ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन, राणी मुखर्जी यांच्या 'बाबुल' सिनेमासाठी रीमाने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलंय.5 / 7याशिवाय २००७ मध्ये रितेश देशमुख, संजय दत्त, अर्शद वारसी यांच्या 'धमाल' सिनेमासाठी तिने असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम केलं. 6 / 7याशिवाय 'आरं आरं आबा आता तरी थांबा' या मराठी सिनेमासाठीही सहाय्यक दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमात रीमाचे वडील सदाशिव अमरापूरकर प्रमुख भूमिकेत होते7 / 7रीमा सध्या युट्यूबवर स्वतःचा पॉडकास्ट शो चालवत असून तिच्या या पॉडकास्टला मराठी सेलिब्रिटी आणि विविध क्षेत्रात काम करणारी माणसं हजेरी लावत असतात.