Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...अन् आमचे मार्ग वेगळे झाले", रिंकू राजगुरुचा ब्रेकअपबद्दल खुलासा, कोण होता बॉयफ्रेंड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:27 IST

1 / 11
रिंकू राजगुरु मराठी इंडस्ट्रीतला लोकप्रिय चेहरा आहे. केवळ २३ वर्षांची असूनही तिचे विचार खूप मॅच्योर आहेत. नुकतंच रिंकूने पहिल्यांदाच प्रेम, ब्रेकअपबद्दल खुलासा केला.
2 / 11
राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकू राजगुरु म्हणाली, 'माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. प्रेम ही जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. पण सगळ्यात जास्त भीतीही मला प्रेमाचीच वाटते.'
3 / 11
'कारण सध्याच्या पिढीचं जे प्रेम आहे ना ते मला झेपत नाहीये. मी प्रेमात खूप टोकाची आहे. मी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये असेल तर मी त्यात पूर्णपणे गुंतलेली असते.'
4 / 11
'आपण नाही म्हटलं तरी त्या माणसावर अवलंबून असतो. पण आजकाल एक भीती असते की कोणीही कोणत्याही कारणावरुन लगेच सोडून जाऊ शकतो.'
5 / 11
'आपल्या आईवडिलांच्या काळात समजून घेणं होतं. आत्ता असं नाहीये. इतके पर्याय आहेत. तुला नाही पटते तर तू नाही तर ही नाहीतर अजून दुसरी. त्यामुळे आता विश्वास ठेवायची भीतीच वाटते.'
6 / 11
'प्रेम केलं तर ते टिकेल का, कोणी मध्येच सोडून तर देणार नाही ना याची मला भीती वाटते. माझं असं आहे की प्रेम केलं तर ते शेववटपर्यंत टिकवायचं. त्यामुळे माणसं आणि प्रेम याची मला आजकाल खूप भीती वाटते.'
7 / 11
'माझ्याशी कोणी सिच्युएनशिपसारखं वागलं तर मी वेडी होईन. मन भरलं की वेगळं व्हायचं असं मला जमत नाही. मी हळवी मुलगी आहे. कारण मी प्रेम केलं तर आरपार करते. तूही मला सोडायचं नाही असं माझं असतं.'
8 / 11
'प्रेम निभवायची ताकद असेल तरच आयुष्यात या. आता तर आणखी एक भीती वाटते की लोक अगोदर म्हणतात हो मी निभावेन पण मधूनच त्यांचा मार्ग बदलतो.
9 / 11
'मला जो असं म्हणेल की तू माझी मरेपर्यंत बायको असशील त्याच्यासोबत मी लग्न करेन. पण रिलेशनशिपची मला आतातरी खूप भीती वाटते. लोकांना कमिटमेंटची भीती वाटते मग कसं होणार?'
10 / 11
'मला कधीच कोणी आवडलं नाही असं अजिबात नाही. एक मुलगा आवडलेला पण आता आमचे रस्ते स्वत:साठी मोकळे आहेत.'
11 / 11
'पण आतातरी मी सिंगल आहे. मला फॅमिली मॅन सारखा मुलगा हवा आहे. ज्याच्यासाठी कुटुंब महत्वाचं असेल, माणसांचा आदर असेल आणि महत्वाचा म्हणजे तो फक्त माझा असावा. बाकी काही नको.'
टॅग्स :रिंकू राजगुरूमराठी अभिनेतारिलेशनशिप