हिरवीगार झाडी, डोंगर आणि तलाव.... निसर्गाच्या कुशीत रिंकू राजगुरू, शेअर केले खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 12:51 IST
1 / 9'सैराट' चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्या घराघरांत लोकप्रिय झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.2 / 9नुकतंच रिंकू कामातून थोडा ब्रेक घेत एका सुंदर आणि शांत ठिकाणी फिरायला गेल्याचं दिसलं.3 / 9निसर्गरम्य परिसरात रिंकूने सुंदर फोटो काढले आहेत. हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.4 / 9रिंकूने हे फोटो शेअर करत 'तुम्ही जिथे जाल, तिथे मनापासून जा' असं कॅप्शन दिलं आहे.5 / 9रिंकूने हे फोटो शेअर करताना शाहरुख खानच्या 'कल हो ना हो' चित्रपटातील 'कुछ तो हुआ है' गाणं लावलं आहे. 6 / 9नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 7 / 9रिंकूला निसर्गरम्य ठिकाणी फिरायला आवडतं. काही दिवसांपुर्वीचं तिने एक पावसाळी ट्रीप केली होती.8 / 9रिंकू 'लोध वाटरफॉल हिडन जेम ऑफ झारखंड' येथे फिरायला गेली होती. लोध धबधब्याच्या परिसरात रिंकूने सुंदर फोटो काढले होते.9 / 9 रिंकू सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असून ती नवीन प्रोजेक्टसोबत वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही चाहत्यांना देत असते. तिच्या नव्या प्रोजेक्टविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.