रश्मिका ते अमृता; कित्येकींनी साकारली महाराणी येसूबाईंची भूमिका, पण प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली 'ही' टीव्ही अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 16:43 IST
1 / 9विकी कौशल मुख्य भूमिकेत असलेल्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. या सिनेमात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आहे. 2 / 9रश्मिकाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. अभिनयात तिने कसर सोडलेली नाही. पण, ती प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवू शकलेली नाही. 3 / 9रश्मिकाप्रमाणेच अनेक अभिनेत्री महाराणी येसूबाई भोसले म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीच्या भूमिकेत ऑनस्क्रीन दिसल्या. 4 / 9अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या सिनेमात येसूबाईंची भूमिका साकारली होती. 5 / 9सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात अभिनेत्री रेवती लिमये ही महाराणी येसूबाई भोसले यांच्या भूमिकेत होती. या सिनेमात गश्मीर महाजनी संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता. 6 / 9शिवरायांचा छावा या सिनेमात अभिनेत्री तृप्ती तोराडमल हिने येसूबाईंची भूमिका साकारली होती. दिग्पाल लांजेकरांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. 7 / 9पण, या सगळ्या अभिनेत्रींमध्ये एका टीव्ही अभिनेत्रीने साकारलेली येसूबाईंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. 8 / 9अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकेने तिला प्रसिद्धी मिळवून दिली. 9 / 9या मालिकेत अभिनेता अमोल कोल्हे छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत होता. आजही अमोल कोल्हे आणि प्राजक्ता गायकवाड यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.