1 / 8प्रिया बापटने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावलं. अनेक हिंदी सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. पहिल्याच हिंदी सिनेमाच्या सेटवर प्रियाला वाईट अनुभव आला होता. 2 / 8प्रियाने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच हा अनुभव सांगितला. हिंदी सिनेमाच्या सेटवर प्रियाला सहकलाकाराकडून चुकीची वागणूक मिळाली होती. 3 / 8प्रिया म्हणाली, 'मराठी इंडस्ट्रीत मला असा अनुभव आला नाही. पण, पहिल्याच हिंदी सिनेमाच्या शूटिंग करत असताना माझ्यासोबत विचित्र प्रकार घडला. पण मी त्या अभिनेत्याचं नाव घेणार नाही'. 4 / 8'त्या सिनेमात फक्त एकच किसिंग सीन होता. पण मला त्या सीनचीही गरज वाटत नव्हती. पण, मी दिग्दर्शकामुळे मी तो सीन करण्यासाठी तयार झाले होते'. 5 / 8'मी एकाच किसिंग सीनसाठी होकार दिला होता. पण त्यानंतरही सिनेमात असे काही क्षण होते तिथे माझा सहअभिनेता मला किस करत राहिला'. 6 / 8'मला त्यावेळी स्वत:साठी ठाम भूमिका घेता आली नाही. कारण मला माहीत नव्हतं की मी काय करायला हवं'. 7 / 8'आम्ही एकाच हॉटेलमध्ये पण वेगळ्या रुम्समध्ये राहत होतो. तो मला मेसेज करायचा की आपण डिनरला जाऊया. तू इकडे ये मी तुला स्विमिंग शिकवतो'. 8 / 8'मी त्याला म्हटलं की मला यातलं काहीही नको. असं माझ्यासोबत यापूर्वी कधीच घडलेलं नव्हतं आणि घडूही नये', असं प्रियाने सांगितलं.