Join us
Daily Top 2Weekly Top 5

अशी ही मदनमंजिरी! 'फुलवंती' प्राजक्ता माळीचा कान्समध्ये जलवा, नऊवारी साडीत खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 12:28 IST

1 / 8
'कान्स'या प्रतिष्ठित जागतिक फिल्म फेस्टिवलमध्ये यंदा मराठीचाही आवाज दुमदुमला. अभिजात मराठीच्या ग्लोबल लाँचसाठी मराठी कलाक्षेत्रातील अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर यांनी कान्समध्ये हजेरी लावली.
2 / 8
सर्वांनीच मराठीचं प्रतिनिधित्व करत कान्सच्या रेड कार्पेटवर पदार्पण केलं. नऊवारी साडी, पैठणी या महाराष्ट्रीय संस्कृतीला त्यांनी तिथे प्रमोट केलं.
3 / 8
मराठी प्रेक्षकांची लाडकी 'फुलवंती' प्राजक्ता माळीच्या लूकची तर सर्वांनाच उत्सुकता होती. ग्लोबल लाँचसाठी तिने मरुन रंगाचा हा रिव्हीलिंग वनपीस घातला होता ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसली.
4 / 8
तर रेड कार्पेटसाठी निळ्या रंगाच्या नऊवारी साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुलून आलं. काठापदराची नऊवारी, कमरपट्टा आणि पारंपरिक दागिने फ्लॉन्ट करत तिची रेड कार्पेटवर एन्ट्री झाली.
5 / 8
प्राजक्ताने तिच्या या लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत. फ्रान्समधील प्रसिद्ध फ्रेंच रिव्हेरा येथे तिने खास फोटोशूट केलं. तिच्या नऊवारीचा पदर उडवत तिने मस्त पोज दिल्या.
6 / 8
केसांचा अंबाडा त्यावर खोपा, अॅक्सेसरीज, गळ्यात हार, सोन्याचे कानातले, नथ, कपाळी चंद्रकोर, हातात बांगड्या आणि पायात पैंजण असा तिचा प्रेमात पाडणारा लूक आहे.
7 / 8
'काही लिहायची गरज? फक्त… मिळत असलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल… खूप प्रेम' असं कॅप्शन तिने पोस्टला दिलं आहे.
8 / 8
चाहत्यांनी प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला 'जलपरी' असं संबोधलं आहे. समुद्राच्या काठावर तिला निळ्या नऊवारी साडीत बघून चाहते भाळले आहेत.
टॅग्स :प्राजक्ता माळीमराठी अभिनेताकान्स फिल्म फेस्टिवल