Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:40 IST

1 / 9
आपल्या निखळ सौंदर्याने, साध्या आणि तरीही नखरेल अभिनयाने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. कधी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील तिचं खुमासदार निवेदन, तर कधी 'प्राजक्तराज' या दागिन्यांच्या ब्रँडच्या माध्यमातून जपलेला मराठमोळा वारसा; प्राजक्ता कायमच चर्चेत असते.
2 / 9
प्राजक्ता माळीच्या लोकप्रियतेसोबतच तिला एक प्रश्न वारंवार विचारला जातो, तो म्हणजे 'प्राजक्ता, तू लग्न कधी करणार?'
3 / 9
३६ वर्षांची प्राजक्ता आजही सिंगल आहे, यावर तिच्या लाखो चाहत्यांचा विश्वास बसत नाही. मात्र, नुकतीच तिने सोशल मीडियावर एक अशी पोस्ट शेअर केली आहे, ज्याने तिच्या सिंगल असण्यामागचं खरं आणि तितकंच मिश्किल कारण समोर आलं आहे.
4 / 9
प्राजक्ता सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर पण विचार करायला लावणारी पोस्ट शेअर केली आहे.
5 / 9
प्राजक्ताने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, 'मी सिंगल आहे कारण मला लोक आवडत नाहीत. पण मला असा एक माणूस शोधायचा आहे जो कोणालाही आवडत नाही, पण मला मात्र खूप आवडतो आणि जो माझा द्वेष करत नाही.'
6 / 9
प्राजक्ताने या पोस्टसोबत हसण्याचे इमोजीही शेअर केले आहेत. म्हणजेच, प्राजक्ताला तिच्या आयुष्यात असा एखादा 'खास' माणूस हवा आहे, ज्याची तिची केमिस्ट्री जगापेक्षा वेगळी असेल.
7 / 9
प्राजक्ताची लोकप्रियता केवळ पडद्यापुरती मर्यादित नाही. इन्स्टाग्रामवर तिचे २.३ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
8 / 9
अलीकडेच तिचा 'फुलवंती' हा चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यातून तिने आपल्या नृत्याची आणि अभिनयाची जादू पुन्हा एकदा दाखवून दिली. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून आणि तिच्या दागिन्यांच्या व्यवसायातून वेळ काढत ती चाहत्यांशी संवाद साधत असते.
9 / 9
प्राजक्ताच्या या लेटेस्ट पोस्टमुळे तिच्या 'मिस्टर राईट'बद्दलची उत्सुकता आता अधिकच वाढली आहे. आता तिला हवा असलेला हा 'युनिक' जोडीदार तिला कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी