Join us  

PHOTOS: काळ्या रंगाच्या साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणू की अप्सरा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 7:00 AM

1 / 10
कधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 
2 / 10
लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
3 / 10
सोनाली देखील घरात आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
4 / 10
नुकताच तिने साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
5 / 10
सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे.
6 / 10
सोनालीने काल तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज दिले. सोनलीचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला असून तिने हीच घोषणा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाठी केली.
7 / 10
सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं... आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या...'
8 / 10
सोनाली कुणालसोबत नात्यात असल्याची तिने काही महिन्यांपूर्वी कबुली दिली होती. त्यानंतर सोनाली आणि कुणाल लग्न कधी करतायेत याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली होती.
9 / 10
सोनालीने साखरपुड्याविषयी सांगितल्यानंतर तिचे फॅन्स खूप खूश झाले असून सोशल मीडियाद्वारे ते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
10 / 10
टॅग्स :सोनाली कुलकर्णी