Join us

'पछाडलेला'मधील लक्ष्याच्या बहिणीने सोडली इंडस्ट्री, आता करते 'हे' काम, १५ वर्षांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 16:14 IST

1 / 7
मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक म्हणजे 'पछाडलेला'. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या हॉरर सिनेमात भरत जाधव, श्रेयस तळपदे, अभिराम भडकमकर, दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते, मेघा घाडगे, अश्विनी कुलकर्णी, नीलम शिर्के, लक्ष्मीकांत बेर्डे अशी स्टारकास्ट होती.
2 / 7
या सिनेमात नीलम शिर्केने सुनयना ही लक्ष्याच्या बहिणीची भूमिका साकारली होती. पण, नीलम अचानक इंडस्ट्रीमधून गायब झाली.
3 / 7
'असंभव', 'वादळवाट' अशा सुपरहिट मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. आता १५ वर्षांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत नीलमने अभिनयापासून दूर राहण्याचं कारण सांगत आता काय करते याचा खुलासा केला आहे.
4 / 7
नीलमने अभिनयातून निवृत्ती घेतली आहे. ती जरी अभिनयापासून दूर असली तरी कलाविश्वात मात्र सक्रिय आहे. नीलम अस्मी प्रॉडक्शन ही निर्मिती संस्था चालवते.
5 / 7
'जेव्हा करिअरच्या पीकवर असेन आणि तुम्हाला कोणती भूमिका करायला आवडेल, असं मला समोरून विचारलं जाईल. तेव्ही निवृत्ती घ्यायची असं मी आधीच ठरवलं होतं', असं नीलम म्हणाली.
6 / 7
'मी एकेकाळी ७२ तास काम करायचे. एका सेटवरुन दुसऱ्या सेटवर शूटिंगसाठी जावं लागायचं. आणि या सगळ्यात माझं पर्सनल लाइफ कुठेच नव्हतं. म्हणून मी निवृत्ती घेतली.'
7 / 7
'अभिनयातून निवृत्ती घेतल्यानंतर मला जे करायचं होतं ते सगळं मी केलं. मी माझे छंद जोपासले'.
टॅग्स :टिव्ही कलाकारसेलिब्रिटीसिनेमा