कुठे गेली 'पछाडलेला'मधली श्रेयसची गर्लफ्रेंड? सिनेमानंतर झालेली गायब, आता काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 13:15 IST
1 / 8'पछाडलेला' या मराठीतील गाजलेल्या सिनेमाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं. झपाटलेलानंतर मराठीतील हॉरर सिनेमांमध्ये 'पछाडलेला'चं नाव घेतलं जातं. 2 / 8या सिनेमात श्रेयस तळपदे, भरत जाधव, दिलीप प्रभावळकर, अभिराम भडमकर, वंदना गुप्ते, मेघा घाटगे, नीलम शिर्के, अश्विनी कुलकर्णी अशी स्टारकास्ट होती. 3 / 8सिनेमात श्रेयसची गर्लफ्रेंड आणि दुर्गा मावशीची लेक मनिषा ही भूमिका अश्विनी कुलकर्णीने साकारली होती. 4 / 8'सूड दुर्गे सूड' म्हणणाऱ्या दुर्गा मावशीची लेक आता कशी दिसते? काय करते हे तुम्हाला माहितीये का?5 / 8'पछाडलेला' सिनेमानंतर अश्विनी फारशी कुठे दिसली नाही. पण, 'नाय वरण भात लोणचं, कोण नाय कोणचं' या सिनेमामुळे ती पुन्हा चर्चेत आली होती. 6 / 8अश्विनीने 'गोविंदा', 'विठ्ठल माझा सोबती', 'घे डबल', 'व्हॉट्स अप लग्न', 'फुलराणी', 'बापू वीरू वाटेगावकर', '८ दोन ७५' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. 7 / 8'सौभाग्यवती सरपंच' या वेबसीरिजमध्येही ती दिसली होती. 8 / 8पहिल्यापेक्षा आता अश्विनी फारच ग्लॅमरस दिसते. अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करत असते.