By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 15:33 IST
1 / 8अभिनेत्री निर्मिती सावंत हे नाव मराठी इंडस्ट्रीत सर्वात अग्रस्थानी आहे. परफेक्ट कॉमेडी टायमिंग, उत्कृष्ट अभिनय यामुळे त्यांनी वेगळं स्थान निर्माण केलं आहे.2 / 8आपण त्यांना टीव्ही, सिनेमा आणि नाटकांमध्ये पाहिलं आहेच. त्यांचा स्क्रीनवरील वावर हा भल्याभल्यांना टक्कर देतो. 3 / 8निर्मिती सावंत यांचा मुलगा अभिनय हा देखील कलाकार आहे. त्याने काही मालिकांमध्ये काम केलं आहे. तसंच सिनेमांमध्येही तो दिसतो.4 / 8दरम्यान अभिनयची बायको आणि निर्मिती सावंत यांची सूनही खूप हुशार आहे. पूर्वा पंडित असं तिचं नाव आहे. २०१७ सालीच अभिनय आणि पूर्वाने लग्नगाठ बांधली.5 / 8पूर्वा दिसायला अतिशय सुंदर आहे. ती उत्तम आर्टिस्ट आहे. जे जे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये तिने शिक्षण घेतलं आहे. अभिनय आणि तिची लग्नाआधीपासून १२ वर्षांची मैत्री होती.6 / 8पूर्वा पंडित ही डुडल आर्टिस्ट आहे. तिची स्वत:ची डुडल कंपनी आहे. सोशल मीडियावर तिच्या डुडल आर्ट्सची झलक दिसते. तसंच ती होम डेकोररही आहे. 7 / 8पूर्वा आणि निर्मिती सावंत सासू सून कमी आणि माय लेकीच जास्त वाटतात. लग्नाआधीही ती बऱ्याच वर्षांपासून घरी येत असल्याने तिची सासूसोबत तेव्हापासूनच गट्टी जमली होती. 8 / 8निर्मिती सावंतच्या प्रत्येक सिनेमाच्या इव्हेंटला लेक अभिनय आणि सून पूर्वा हजेरी लावतात. तसंच निर्मिती सावंतही सूनेच्या करिअरला कायम प्रोत्साहन देतात.