आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमध्ये दिसली नेहा पेंडसे, फोटो झाले व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 14:13 IST
1 / 9नेहा पेंडसे सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जिने मराठी आणि हिंदी चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे.2 / 9नेहा पेंडसे बऱ्याचदा सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येते. मात्र आता तिने आतापर्यंत कधीच न पाहिलेल्या बोल्ड लूकमधील फोटो शेअर केलेत.3 / 9या फोटोशूटमध्ये नेहा पेंडसेने ऑफ शोल्डर व्हाइट रंगाचा वन पीस घातला आहे. यात तिने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात गोल्डन रिंगचे इअररिंग्स घातले आहेत.4 / 9नेहा पेंडसे या फोटोत खूपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांसह कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव केलाय. 5 / 9नेहा पेंडसेने वयाच्या १० व्या वर्षी बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली. तिने १९९५ मध्ये एकता कपूरच्या 'कॅप्टन हाऊस' या टीव्ही शोमध्ये काम केले होते.6 / 9नेहाने हिंदी, मराठी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९९९ मध्ये 'प्यार कोई खेल नहीं' या हिंदी चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.7 / 9'मे आय कम इन मॅडम?' (May I Come In Madam?) आणि 'भाभीजी घर पर है!' (Bhabiji Ghar Par Hain!) यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमध्ये तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत, ज्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली.8 / 9 नेहा 'बिग बॉस १२' (Bigg Boss 12) ची स्पर्धक देखील होती. 9 / 9नेहाने २०२० मध्ये शार्दुल ब्यास या उद्योगपतीशी लग्न केले.