Join us

नाना पाटेकरांची पत्नी आहे 'ही' अभिनेत्री, IIT उत्तीर्ण होऊनही सोडलं शिक्षण; अभिनयातच केलं करिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 10:35 IST

1 / 7
सिनेसृष्टीत नाना पाटेकरांचं (Nana Patekar) मोठं नाव आहे. ९० च्या दशकापासून ते आजपर्यंत ते दमदार सिनेमे देत आहेत. 'खामोशी', 'अग्नीसाक्षी', 'प्रहार', 'वध', 'टॅक्सी नंबर ९२११' पासून ते आता 'वेलकम','हाऊसफुल' या सिनेमांमध्ये ते दिसले.
2 / 7
नीलकांती पाटेकर या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्याही आहेत. 'आत्मविश्वास' या सिनेमासाठी त्यांना पुरस्कार मिळाला होता.
3 / 7
नाना पाटेकरांची पत्नीही दिग्गज अभिनेत्री आहे. नीलकांती पाटेकर (Neelakanti Patekar) या नानांच्या पत्नी आहेत. 'गोठ' मालिकेतील बयो आजी म्हणून त्यांना अनेकजण ओळखतात.
4 / 7
नीलकांती यांचा पुण्यात जन्म झाला. त्यांचे वडील एक्साईज डिपार्टमेंटमध्ये होते. त्यामुळे सतत त्यांची बदली होत असे. नीलकांती यांनी आयआयटी करावं असं त्यांच्या वडिलांच्या इच्छा होती.
5 / 7
त्याप्रमाणे त्या आयआयटी परीक्षा उत्तीर्णही झाल्या. मात्र त्यांना अभिनयातच रस होता. १९६६ मध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय केला होता. त्यामुळे त्यांना अभिनयातच करिअर करायचं होतं. आयआयटी परीक्षा उत्तीर्ण असूनही त्यांनी अभ्यास सोडला आणि त्या थिएटरकडे वळल्या.
6 / 7
एका नाटकावेळीच त्यांची नाना पाटेकरांशी भेट झाली. १९७८ मध्ये दोघांनी लग्नही केलं. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला. मात्र त्यांच्या मुलाचं अडीच वर्षांचा असतानाच निधन झालं. नंतर काही वर्षांनी त्यांना मल्हार हा मुलगा झाला.
7 / 7
नीलकांती पाटेकर मधल्या काळात अभिनयापासूनही दुरावल्या होत्या. नानांसोबत त्यांचा घटस्फोट झालेला नाही. मात्र दोघंही वेगवेगळे राहतात. नुकतंच त्यांना विकी कौशलच्या 'छावा' सिनेमात पाहिलं गेलं.
टॅग्स :नाना पाटेकरमराठी अभिनेता