By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 14:56 IST
1 / 9अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'राजा शिवाजी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.2 / 9 गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीत रितेश देशमुखची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची प्रचंड चर्चा आहे.3 / 9 जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीची निर्मिती असलेला हा चित्रपट येत्या १ मे २०२६ रोजी रिलीज होणार आहे. 4 / 9 यामध्ये रितेश देशमुखसह जिनिलिया देशमुख, महेश मांजरेकर, संजय दत्त, अभिषेक बच्चन,विद्या बालन, फरदीन खान, सचिन खेडेकर,जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा तगड्या कलाकारांची फळी आहे. 5 / 9 नुकतंच या चित्रपटातील 'छत्रपती'हे नवीन गाणं प्रदर्शित झालं. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलंय. तर रेमो डिसुझा या गाण्याचा कोरिओग्राफर आहे. त्यांनी या गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे.6 / 9या गाण्यात मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय. 7 / 9या गाण्यात मराठी मालिकाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्रीची झलक पाहायला मिळतेय. 8 / 9'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका साकारून शिवानीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.आता या चित्रपटामधील गाण्यात तिची झलक पाहून प्रेक्षक सुखावले आहेत.9 / 9दरम्यान,'राजा शिवाजी' चित्रपटात शिवानी कोणती भूमिका साकारणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तसंच शिवानीने देखील या संदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.