Join us  

मृण्मयी देशपांडेच्या हास्यावर आहेत सगळेच फिदा, तिचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल खल्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 6:00 AM

1 / 9
मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस असून तिने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
2 / 9
कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
3 / 9
मृण्मयीने 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
4 / 9
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारत मृण्मयीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
5 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून मृण्मयी नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.
6 / 9
मृण्यमयीने फर्जंद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.
7 / 9
मृण्मयी देशपांडेने ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
8 / 9
मृण्मयी ही मुळची पुण्याची असून तिचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे.
9 / 9
मृण्मयीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.
टॅग्स :मृण्मयी देशपांडे