Join us

Mother's Day 2022: आई, तुझ्याशिवाय मी कोणीही नाही...; पाहा, मराठी कलाकारांचे आईसोबतचे गोड फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2022 13:27 IST

1 / 10
अभिनेता शशांक केतकरने आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. आई, तुझ्याशिवाय मी कोणीही नाही..., असं सुंदर कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.
2 / 10
चंद्रा अर्थातच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने आपल्या आईसोबतचा सुंदर फोटो शेअर करत मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तू तुझ्या असण्यानं माझं आयुष्य उजळवून टाकलंस, खूप प्रेम..., असा सुंदर मॅसेज तिनं लिहिला आहे.
3 / 10
आय लव्ह यू मां..., असं लिहित अभिनेत्री सायली संजीव हिने आईसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात मायलेकींचं प्रेम स्पष्ट दिसतं.
4 / 10
प्रिया बापट हिने आई आणि बाबा दोघांसाठीही सुंदर पोस्ट लिहिली आहे. आज मदर्सच्या दिवशी प्रियाच्या बाबांचा वाढदिवसही असतो. आईची कमतरता कायमच जणवेल. आज तुमच्या वाढदिवशी मदर्स डे आहे, म्हणून दोन्ही शुभेच्छा तुम्हालाच..., असं तिनं लिहिलं आहे.
5 / 10
मृण्मयी देशपांडे हिनं आय लव्ह यू म्हणत आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आईसोबतचा गोड फोटो तिने शेअर केला आहे.
6 / 10
सुख म्हणजे नक्की काय असतं फेम गौरी अर्थात गिरिजा प्रभू हिने आईसोबतचा एक गोड फोटो शेअर केला आहे. हॅपी मदर्स डे आई..., असं तिनं लिहिलं आहे.
7 / 10
अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा या फोटोमध्ये आपल्या आईसोबतचा बालपणीचा आणि आत्ताचा सुंदर फोटो शेअर केला आहे. तू एक भावना आहेस, जी मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा शब्दांत तिनं आईबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
8 / 10
ती परत आलीये या मालिकेतील अभिनेत्री फेम कुंजिका काळवींटनेसुद्धा आपल्या आईसोबत फोटो शेअर केला आहे. ‘आई गं’ हे तिनं दिलेलं कॅप्शन पुरेसं बोलकं आहे.
9 / 10
मिसेस मुख्यमंत्री फेम सुमीचा अर्थातच अभिनेत्री अमृता धोंगडेचा आपल्या आई आणि बहिणीसोबतचा हा गोड फोटो. तू आहेस म्हणून आम्ही आहोत, असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
10 / 10
येऊ कशी तशी मी नांदायला फेम स्वीटू अर्थातच अभिनेत्री अन्विता फलटणकर हिने आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. मैत्रिणीपेक्षाही जास्त... बेस्ट फ्रेन्ड, असं तिनं आईला उद्देशून लिहिलं आहे.
टॅग्स :मदर्स डेसेलिब्रिटी