1 / 7'बिग बॉस' मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण 'झापुक झुपूक' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आला आहे.2 / 7केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.3 / 7या सिनेमात सूरज चव्हाणसह जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे,पायल जाधव,दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी अशी तगडी स्टारकास्ट आहे.4 / 7सध्या मनोरंजनविश्वात 'झापुक झुपूक' मध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीच्या नावाची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. 5 / 7तिच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. ही अभिनेत्री म्हणजे जुई भागवत आहे.6 / 7अभिनेत्रीने या क्लासी फोटोशूटसाठी हटके पोझ देत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 7 / 7जुई भागवतबद्दल सांगायचं झालं तर ती लोकप्रिय मराठी अभिनेत्री दीप्ती भागवत यांची लेक आहे. याशिवाय जुई 'लाईक्स आणि सबस्क्राईब’ या सिनेमात देखील झळकली आहे. तसंच महाराष्ट्राचा सुपरस्टार या रिएलिटी शोमध्ये जुई सहभागी झाली होता.