By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:14 IST
1 / 8सेलिब्रिटींचे जुने, बालपणीचे फोटो व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. त्यांचे हे फोटो पाहून त्यांना ओळखणंही कठीण होतं. 2 / 8शाळेच्या गणवेशातील या चिमुकलीचा फोटो पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल. गोबरे गाल, घारे डोळे आणि नाकावर राग असा तिचा क्युट फोटो आहे. 3 / 8तिचे शाळेतीलही आणखीही काही फोटो तिने शेअर केले आहेत. गॅदरिंगमध्ये परफॉर्म करताना तर कधी बक्षीस घेतानाचा तिचा फोटो आहे.4 / 8काळा फ्रॉक घालून बसलेली ही गोंडस मुलगी आज मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अनेकदा सोशल मीडियावर लहानपणीचे फोटो शेअर करते.5 / 8ही चिमुकली दुसरी कुणी नसून अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी ‘अप्सरा’ आहे. 'नटरंग' सिनेमातील तिचं 'अप्सरा आली' गाणं तुफान गाजलं.6 / 8'मितवा','गाढवाचं लग्न','क्षणभर विश्रांती', 'हिरकणी', 'नटरंग'पासून ते आता नुकताच आलेला 'तिघी' असे तिचे अनेक सिनेमे गाजले.7 / 8अभिनयासोबतच सोनाली उत्तम डान्सरही आहे. फुलवा खामकरसोबतचे तिचे अनेक डान्स व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात.8 / 8२०२१ साली सोनाली कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. कुणाल दुबईत असतो त्यामुळे सोनाली कधी दुबई तर कधी भारतात असते. नवऱ्यासोबत अनेक ठिकाणी ती व्हेकेशनवरही जाते.