1 / 9सध्या महाराष्ट्रात ठाकरे बंधूंच्या युतीची प्रचंड चर्चा आहे. एकत्र येण्याबाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सध्या तरी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 2 / 9ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याने शिवसैनिक आणि मनसैनिक खूश आहेत. तर, असं झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. 3 / 9राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर अभिनेत्री सायली संजीवने तिचं मत व्यक्त केलं आहे. 4 / 9सायलीला राजकारणात प्रचंड रस आहे. ती राज ठाकरेंच्या महाराष्ट्रात नवनिर्माण सेनेच्या चित्रपट सेनेची उपाध्यक्षा आहे. सायलीने 'आम्ही असं ऐकलंय' या पॉडकास्टमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीवर मत मांडलं आहे. 5 / 9सायली म्हणाली, 'याबाबतीत सध्या मला काय वाटतंय हे मला कळत नाहीये. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या हितासाठी जे आहे ते या राज्यातील सगळ्या नेत्यांनी करावं. राज ठाकरेही नेहमी हेच म्हणतात'. 6 / 9'एखादी डेव्हलपेंट महाराष्ट्रात होते तेव्हा मला आनंद होतो. जेव्हा जेव्हा एखादा विकास घडतो, तेव्हा खरंच बरं वाटतं. महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे'. 7 / 9'फॉरेनच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आवडतात. त्या आपल्याकडे आल्या की आपल्याला आनंद होतो. आपल्याकडे मेट्रोचा फायदा अनेकांना झाला आहे. या गोष्टी होत राहिल्या पाहिजेत'. 8 / 9'म्हणून मग माझं म्हणणं आहे की कोणीही एकत्र आलं की मला आनंद होईल. फक्त महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे'. 9 / 9'मला असं वाटतं की त्या दोघांनाही हेच वाटतं की महाराष्ट्राचा विकास व्हावा', असंही सायली पुढे म्हणाली.