'पछाडलेला' चित्रपटातील श्रेयसची ऑनस्क्रिन प्रेयसी आता कशी दिसते? २१ वर्षात इतका बदलला अभिनेत्रीचा लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 16:24 IST
1 / 62 / 6२००४ साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.या हॉरर सिनेमाचं दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केलं होतं. या चित्रपटाची आगळीवेगळी पण थरकाप उडवणारी कथा सगळ्यांच्या पसंतीस उतरली.3 / 6 'पछाडलेला'चित्रपटात दूर्गा मावशीची लेक श्रेयसची प्रेयसी म्हणजेच मनीषा नावाची व्यक्तिरेखा अभिनेत्री अश्विनी कुलकर्णीने साकारली आहे. या चित्रपटात अश्विनीने साकारलेली भूमिका अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहे.4 / 6 पछाडलेला सिनेमात दिसणारी ही अभिनेत्री पूर्वीपेक्षा आता फारच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. अश्विनी सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. 5 / 6 सध्या अश्विनी 'वचन दिले तू' मला या स्टार प्रवाहवरील नव्याकोऱ्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत ती शैलजा नावाची भूमिका साकारते आहे. 6 / 6अश्विनीने तिच्या करिअरमध्ये 'गोविंदा', 'विठ्ठल माझा सोबती', 'घे डबल', 'व्हॉट्स अप लग्न', 'फुलराणी', 'बापू वीरू वाटेगावकर', '८ दोन ७५' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.