Join us  

एव्हरग्रीन ऐश्वर्या नारकरचा लेक आहे प्रचंड हँडसम; तुम्ही पाहिलंय का कधी त्याला?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 3:25 PM

1 / 12
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वय हा केवळ आकडा असतो हे ऐश्वर्या नारकर यांच्याकडे पाहिल्यावर कळतं.
2 / 12
वयाची ५० वर्ष पार केल्यानंतरही त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांमध्ये कायम त्यांच्या फिटनेसची आणि सौंदर्याची चर्चा होते.
3 / 12
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या नारकर कायम त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.
4 / 12
ऐश्वर्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पती अविनाश नारकरदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत.
5 / 12
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर ही मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन जोडी म्हणून ओळखली जाते.
6 / 12
अनेक चित्रपटांमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश या दोघांनीही एकत्र काम केलं आहे.
7 / 12
ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.
8 / 12
ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं.
9 / 12
त्यांच्या मुलाचे नाव अमेय नारकर असून तो आई-वडिलांइतकाच दिसायला स्मार्ट आहे.
10 / 12
अमेय सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे फोटो शेअर करत असतो.
11 / 12
आईप्रमाणेच अमेयलादेखील फोटोशूटची आवड असल्याचं दिसून येतं.
12 / 12
नारकर कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो
टॅग्स :अविनाश नारकरसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा