1 / 9९०चं दशक गाजवलेले अभिनेते जयवंत वाडकर यांची लेक स्वामिनी नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. स्वामिनीने मल्याळी बॉयफ्रेंड वरुण नायरसोबत लग्न करत संसार थाटला आहे. 2 / 9स्वामिनीच्या लग्नाला सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली होती. तिच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 3 / 9स्वामिनी आणि वरुण यांनी दाक्षिणात्य आणि मराठी अशा दोन्ही पद्धतीने लग्न करत सप्तपदी घेतले. 4 / 9जयवंत वाडकर यांची मुलगी स्वामिनीही अभिनेत्री आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत तिने अभिनय क्षेत्र निवडलं. 5 / 9'एफयू' या सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. 'ये है आशिकी'मध्येही ती झळकली होती. 6 / 9प्लॅनेट मराठीवरील 'बाबा' या सिनेमात जयवंत वाडकर आणि स्वामिनी ही बापलेकीची जोडी दिसली होती. 7 / 9स्वामिनीने सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. तिला डान्सचीही आवड आहे. 8 / 9स्वामिनी एक बेली डान्सर आहे. ती अनेकदा तिचे हॉट फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. 9 / 9स्वामिनीचा नवराही कलाविश्वात सक्रिय असून तो एक निर्माता आहे.