Join us  

अजिंक्य देव यांचा लेक आहे कलाविश्वात सक्रीय; बॉलिवूडमध्ये आजमावतोय नशीब

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2022 11:05 AM

1 / 10
मराठी कलाविश्वातील रुबाबदार आणि हँडसम हंक म्हणून एक काळ गाजवणारा अभिनेता म्हणजे अजिंक्य देव.
2 / 10
आजही अजिंक्य देव यांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही.
3 / 10
अजिंक्य देव यांना कुटुंबाकडून अभिनयाचा वारसा मिळाला आहे.
4 / 10
त्यांचे आई-वडील अभिनेता रमेश देव आणि सीमा देव या जोडीनेही कलाविश्व गाजवलं होतं.
5 / 10
विशेष म्हणजे रमेश देव आणि अजिंक्य देव यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या मुलानेही कलाविश्वात पदार्पण केलं आहे.
6 / 10
८०-९० चा काळ गाजवणाऱ्या अजिंक्य देव यांना दोन मुलं आहेत. यात एक मुलगी आणि एक मुलगा आहे.
7 / 10
अजिंक्य देव यांनी १९८६ मध्ये आरती देव यांच्यासोबत लग्न केलं. पार्ला कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची भेट आरतीसोबत झाली आणि ते प्रेमात पडले.
8 / 10
अजिंक्य देव यांच्या मोठ्या मुलाचं नाव आर्य असं असून तो कलाविश्वात सक्रीय आहे.
9 / 10
आर्य बॉलिवूडमध्ये सक्रीय असून सध्या तो सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत आहे.
10 / 10
अजिंक्य देव यांना एक मुलगी असून ती स्पेशल चाइल्ड असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे आपल्या लेकीसाठी त्यांनी विशेष मुलांची शाळाही सुरु केल्याचं म्हटलं जातं.
टॅग्स :अजिंक्य देवरमेश देवसेलिब्रिटीसिनेमा