Join us
Daily Top 2Weekly Top 5

'धडाकेबाज' सिनेमातील लक्ष्याची 'गंगी' आठवतेय का? आता दिसते अशी, गाजवतेय छोटा पडदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:00 IST

1 / 7
महेश कोठारे दिग्दर्शित धडाकेबाज हा सिनेमा आजही प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, दीपक शिर्के तसेच निवेदिता सराफ, प्राजक्ता कुलकर्णी या कलाकारांच्या अभिनयाने सजलेला हा चित्रपट रसिकांच्या अजुनही आठवणीत कायम आहे.
2 / 7
या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे यांना एक जादूची बाटली मिळते. त्या बाटलीत गंगाराम कैद असतो. त्याच्याकडे असते ती जादूची रेती. ही रेती वापरून गंगाराम लक्ष्या आणि त्याच्या मित्रांची मदत करतो पण या चित्रपटातील एक गूढ अजूनही उलगडलेलं नाही.
3 / 7
दरम्यान, चित्रपटात लक्ष्याची प्रेयसी म्हणजे गंगी फुलवालीची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी साकारली होती. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या पडद्यावर पाऊल ठेवलं.
4 / 7
करिअरमधील पहिल्याच चित्रपटाने प्राजक्ता कुलकर्णी यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. आजही धडाकेबाज सिनेमाचं नाव जरी कोणी काढलं तरी लक्ष्या आणि त्याची गंगी डोळ्यासमोर उभी राहते.
5 / 7
या चित्रपटानंतर प्राजक्ता यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. मराठीसह काही हिंदी चित्रपटांमध्येही त्या झळकल्या. गुंज, शोध, आग, दामिनी या सिनेमांमध्येही त्यांनी काम केलं आहे.
6 / 7
सध्या प्राजक्ता कुलकर्णी या स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेत काम करताना दिसत आहे. या मालिकेत त्यांनी कल्पना सुभेदार नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेत मायाळू आणि सूनेच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी ही सासू प्रेक्षकांना प्रचंड भावली आहे.
7 / 7
याशिवाय प्राजक्ता कुलकर्णी सोशल मीडियावरही तितक्याच सक्रिय असल्याच्या पाहायला मिळतात. या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहेत. धडाकेबाज चित्रपटात दिसणारी लक्ष्याची ही गंगी आता फारच सुंदर दिसते.
टॅग्स :मराठी चित्रपटसेलिब्रिटी