Join us

पस्तीशी उलटली तरीही लग्न का केलं नाही? ललित प्रभाकरने सांगितलं कारण, म्हणाला- "लग्न करून मला..."

By कोमल खांबे | Updated: September 12, 2025 13:45 IST

1 / 9
मराठी सिनेइंडस्ट्रीतील चॉकलेट बॉय म्हणून ललित प्रभाकरकडे पाहिलं जातं. 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेतून ललितने प्रेक्षकांना वेड लावलं.
2 / 9
आज ललितचा वाढदिवस आहे. ललित ३८ वर्षांचा झाला आहे. पण, पस्तीशी ओलांडली तरीही अजून तो अविवाहित आहे.
3 / 9
'आरपार' या सिनेमाच्या निमित्ताने ललितने 'जस्ट नील थिंग्स' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली.
4 / 9
या मुलाखतीत ललितने लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे.
5 / 9
ललित म्हणाला, 'मेरी दुल्हन तो आजादी है...लग्न म्हणजे खूप जबाबदाऱ्या... मला असं वाटतं की सध्या मी त्या जबाबदाऱ्या घेण्यासाठी तयार नाही'.
6 / 9
'कारण आता माझा फोकस वेगळा आहे. माझं काम वैगेरे या गोष्टी सध्या सुरू आहेत आणि मी त्या गोष्टी एन्जॉयही करतो आहे'.
7 / 9
'ती जबाबदारी घेण्यासाठी मी तयार नसेन आणि मी लग्न केलं तर मग ते अन्याय केल्यासारखं होईल'.
8 / 9
'मला माझ्यावर किंवा अन्य कोणावरही अन्याय करायचा नाहीये', असं तो म्हणाला.
9 / 9
दरम्यान, ललितचा 'आरपार' सिनेमा त्याच्या वाढदिवशीच १२ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे.
टॅग्स :ललित प्रभाकरमराठी अभिनेताटिव्ही कलाकार