आठवीत असताना प्रेमात पडलेली हृता, म्हणाली- "त्यानेच मला प्रपोज केलं, पण फोनवर बोलताना आईने पकडलं अन् मग..."
By कोमल खांबे | Updated: September 9, 2025 14:01 IST
1 / 7हृता दुर्गुळे ही महाराष्ट्राची क्रश आहे. आरपार या सिनेमातून हृता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात हृतासोबत ललित प्रभाकरही दिसणार आहे. 2 / 7एक वेगळी लव्हस्टोरी आरपारमध्ये पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने हृताने तिची पहिली वहिली लव्हस्टोरी सांगितली. 3 / 7आठवीत असताना हृताला एका मुलाने प्रपोज केलं होतं. पण, फोनवर बोलताना अभिनेत्रीला आईने पकडलं, असं हृताने जस्ट नील थिंग्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 4 / 7हृता म्हणाली, 'मी आठवीत होते. मला एका मुलाने प्रपोज केलं होतं'. 5 / 7'मी आईच्या फोनवरुन त्याच्याशी बोलायचे. आणि हे आईला कळेल हे माझ्या लक्षातच आलं नाही. त्यामुळे मी पकडले गेले होते'. 6 / 7'२-३ महिन्यांचंच आमचं रिलेशनशिप होतं. तेव्हा प्रेमाची व्याख्याच माहित नव्हती. पण, पहिलं प्रेम तेच होतं'. 7 / 7'तो माझ्या शाळेतला नव्हता. म्युच्युअल फ्रेंडमधून आमची ओळख झाली होती. मी शाळेतल्या मुलांना डेट नाही करायचे', असंही तिने सांगितलं.