'सैराट'मधील सल्याच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का?, सौंदर्यात अभिनेत्रींनाही देते टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 17:17 IST
1 / 9२०१६ साली सैराट सिनेमा रिलीज झाला आणि या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेड लावले. या चित्रपटातील आर्ची आणि परशा महाराष्ट्रातील घराघरात पोहचले. त्यांच्याशिवाय या सिनेमात सल्याच्या भूमिकेतून अभिनेता अरबाज शेखदेखील लोकप्रिय झाला.2 / 9अरबाज शेखने परश्याचा जीवाभावाचा मित्र सल्याची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून त्याला घराघरात चांगलीच ओळख मिळाली.3 / 9सैराट चित्रपटानंतर अरबाजने बऱ्याच सिनेमात काम केले. यारी, संघर्ष योद्धा जरांगे पाटील, मुसंडी, घर बंदूक बिर्याणी, झुंड, एकदम कडक या चित्रपटांचा समावेश आहे.4 / 9अभिनयाव्यतिरिक्त अरबाजने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. काही महिन्यांपूर्वी त्याने पुण्यात वडगाव बुद्रुक, सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ ‘बेक बडीज’ नावाने केक आणि कॅफे सुरू केले.5 / 9म्हणे, अरबाज शेख लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे. त्याच्या गर्लफ्रेंडला तुम्ही पाहिलंत का? २०१९ सालापासून ते दोघे रिलेशनशीपमध्ये आहेत. 6 / 9अरबाज शेखच्या गर्लफ्रेंडचं नाव सिमरन आहे. ती देखील पुण्यात राहते. ती बेक बडीज शॉपचे कामकाज पाहते. 7 / 9सिमरन दिसायला खूप सुंदर आहे. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. 8 / 9सोशल मीडियावर त्यांनी उघडपणे प्रेमाची कबुली दिली आहे आणि लवकरच ते लग्न करणार असल्याचे बोलले जाते.9 / 9आता अरबाजचे चाहते त्याच्या लग्नाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.