Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी..! मराठी सिनेइंडस्ट्रीतील 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींचा झालाय घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 07:00 IST

1 / 6
तेजश्री प्रधान हिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर छाप उमटविली आहे. तेजश्रीने होणार मी सून या घरची या मालिकेत जान्हवीची भूमिका साकारली होती. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली होती. या मालिकेतील सहकलाकार शशांक केतकरसोबत तिचे प्रेम संबंध जुळले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यातच या दोघांचा संसार संपुष्टात आला. दोघांनी घटस्फोट घेतला.
2 / 6
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. फार कमी लोकांना माहित असेल की, अभिज्ञाचं हे दुसरं लग्न आहे. तिने पहिले लग्न वरुण वैटिकरसोबत केले होते. मात्र काही दिवसात ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर तिने मेहुल पैसोबत दुसरा संसार थाटला.
3 / 6
रुपाली भोसले ही अभिनेत्री सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे चर्चेत येत असते. तिचादेखील घटस्फोट झाला आहे. मिलिंद शिंदे हा तिचा पहिला पती होता. त्यानंतर तिने त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर ती अंकित मगरे याला डेट करत होती. मात्र त्यांचे ब्रेकअप झाले.
4 / 6
रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे. रेश्माने या मालिकेमध्ये दीपाचे पात्र उत्तम साकारले आहे. तिने अभिजीत चौगुले याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, काही कारणांमुळे या दोघांचा घटस्फोट झाला.
5 / 6
सई ताम्हणकर सिनेइंडस्ट्रीत बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सईने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी व मराठी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. सईने काही वर्षापूर्वी अम्येय गोस्वामी याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, अवघ्या काही वर्षात या दोघांचा घटस्फोट झाला.
6 / 6
पप्पी दे पारूला फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. स्मिता गोंदकरने सिद्धार्थ भाटिया या नवी मुंबईतील एका नगरसेवकासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी ती वेगळी झाली.
टॅग्स :सई ताम्हणकररेश्मा शिंदेअभिज्ञा भावेस्मिता गोंदकरतेजश्री प्रधान रुपाली भोसले